Connect with us

गोवा खबर

भाजप दक्षिण गोवा जिल्हा मेडिकल सेलची घोषणा; डॉ. स्नेहा भगवत यांची संयोजकपदी नियुक्ती

Published

on

Spread the love

गोवा खबर: भारतीय जनता पक्ष, गोवा प्रदेशने दक्षिण गोवा जिल्हा मेडिकल सेलची घोषणा केली आहे. या नव्या समितीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंजुरी दिली असून, वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अधिक प्रभावीपणे राबविणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे हा या समितीचा उद्देश असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

नवीन समितीमध्ये डॉ. स्नेहा प्रणव भगवत यांची संयोजक (Convenor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. अमरेश नाईक यांची सहसंयोजक (Co-Convenor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीमध्ये डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, डॉ. शर्मद कुडचडकर, डॉ. अल्रीझा फर्नांडिस, डॉ. धीरज नाईक, डॉ. मयुरी कारेकर, डॉ. प्रतीक भाट, डॉ. सुशांत रायकर, डॉ. शुभंकर निलेश कांडे आणि डॉ. सायली दिनेश नाईक यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भाजप गोवा प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळीयेकर यांनी ही घोषणा केली असून, नव्याने स्थापन करण्यात आलेला दक्षिण गोवा जिल्हा मेडिकल सेल पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसह आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.