Connect with us

गोवा खबर

धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा; दामू नाईक यांना निवेदन सादर

Published

on

Spread the love

गोवा खबर: अखिल गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची मागणी करत भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना निवेदन सादर केले.

या निवेदनाद्वारे धनगर समाजाच्या एसटी दर्जाच्या मागणीला भाजपकडून आणि राज्यस्तरावर अधिक बळकटी मिळावी, तसेच या विषयावर आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली.

यावेळी अखिल गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी आणि समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. धनगर समाजाला एसटी दर्जा मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना व्यापक पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

धनगर समाजाच्या दीर्घकालीन मागणीबाबत सकारात्मक निर्णय व्हावा आणि समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व संबंधित स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.