Connect with us

गोवा खबर

काँग्रेसमध्ये उमेदवारीचा लिलाव आणि भ्रष्टाचार : ग्रासियस यांचे आरोप

Published

on

Spread the love

गोवा खबर : काँग्रेसमधील अंतर्गत भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने गोव्यात खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ वकील राधाराव ग्रासियस यांनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व सिद्धनाथ बुयाव यांच्यावर आरोप करत काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ग्रासियस यांच्या मते, चोडणकर यांच्या विरोधात लेखी तक्रारी असतानाही त्यांना अध्यक्षपदी कायम ठेवणे अनाकलनीय आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया प्रचारासाठी ४.५ कोटी रुपयांचे कंत्राट सिद्धनाथ बुयाव यांच्या कंपनीला देण्यात आले होते. तामिळनाडूची संस्कृती आणि भाषेची कोणतीही माहिती नसलेल्या व्यक्तीला हे कंत्राट मिळणे म्हणजे चोडणकर आणि बुयाव यांनी संगनमताने पक्षाचा निधी हडप करण्यासाठी रचलेला हा एक रॅकेटचा भाग आहे, असा आरोप त्यांनी केला.

आगामी गोव्यातील निवडणुकीसाठी सांताक्रूझ, मांद्रे आणि शिवोली या मतदारसंघांतील उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर तडजोडी झाल्याचा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे, संगीतकार सिद्धनाथ बुयाव यांनी हे आरोप फेटाळून लावत ग्रासियस हे काँग्रेसचे कार्यकर्ते नसून ते भाजपचे कार्यकर्ते म्हणून वागत असल्याचा प्रतिआरोप केला आहे.