Connect with us

गोवा खबर

३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता रोड रेस

Published

on

Spread the love

गोवा खबर:क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय ३१ ऑक्टोबर, २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने धावम्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

दिव्यांग व्यक्ती आणि १० वर्षांखालील ज्युनियर गटासाठी (मुले/मुली) मल्टीपर्पज इंन्डोअर स्टेडियम कांपाल ते मिरामार सर्कलपर्यंत आणि परत (२ किमी).

त्याचप्रमाणे, १० वर्षांवरील आणि १४ वर्षांखालील वयोगटासाठी (मुले/मुली) आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी (पुरुष/महिला) मल्टीपर्पज इनडोअर स्टेडियम कांपाल ते विज्ञान केंद्र आणि परत (३ किमी) १४ वर्षांवरील आणि १८ वर्षांखालील वयोगटासाठी (मुले/मुली) मल्टीपर्पज इनडोअर स्टेडियम, कांपाल ते करंझाळे पेट्रोल पंप आणि परत (५ किमी) आणि खुल्या गटासाठी – १८  वर्षांवरील आणि ६०  वर्षांखालील (पुरुष/महिला) गटासाठी मल्टीपर्पज इनडोअर स्टेडियम, कांपाल ते दोनापावला सर्कल आणि परत (१० किमी) अशी धावण्याची स्पर्धा असेल.