गोवा खबर : शिक्षण ही काळाची गरज असून, सुशिक्षित लोकप्रतिनिधीच राजकारणात नवे आणि योग्य ‘व्हिजन’ देऊ शकतात, असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी गोव्यातील भाजप नेत्यांच्या शिक्षणाबाबत केलेल्या विधानाचे सरदेसाई यांनी पूर्ण समर्थन केले. मडगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, आर्लेकर यांनी भाजपला आरसा दाखवला असून, अनेक अंगठाबहादूर व्यक्ती केवळ स्वार्थासाठी राजकारणात येत आहेत आणि सध्या गोव्यात हेच चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षण नसेल तर राज्याचा विकास योग्य पद्धतीने होऊ शकत नाही, म्हणूनच राजकारणात सुशिक्षित लोकप्रतिनिधी येणे अत्यंत गरजेचे आहे, अशी जोरदार टीका सरदेसाई यांनी यावेळी केली.