Connect with us

गोवा खबर

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते तुळसकरवाडीत रस्ते कामाचे भूमिपूजन; ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

Published

on

Spread the love

गोवा खबर:मतदारसंघातील मूलभूत सुविधांच्या सक्षमीकरणावर भर देत, पेडणेचे आमदार श्री. प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते वारखंड-नागझर पंचायतीमधील तुळसकरवाडी येथील रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरण (ब्लॅकटॉपिंग) कामाची पायाभरणी करण्यात आली. या कामामुळे स्थानिक ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी खराब रस्त्याची समस्या आता सुटणार आहे.

या सोहळ्याला  तोरसे जिल्हा पंचायत सदस्य श्री. राघोबा कांबळी, वारखंड-नागझरच्या सरपंच गौरी जोसाळकर, उपसरपंच देवीदास चारी, पंच सदस्य संभाजी परब, मौरी तुळसकर, कविता कांबळी, माजी सरपंच संजय तुळसकर, तांबोसेचे सरपंच सुबोध महाले, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ आणि तुळशीदास कवठणकर यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजनानंतर बोलताना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, मतदारसंघातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत आणणे हे आमचे प्राधान्य आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत. स्थानिक पंचायतीच्या सहकार्याने विकासाची ही गंगा प्रत्येक वाडीपर्यंत पोहोचवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.