Connect with us

गोवा खबर

सम्राट क्लब नावेली तर्फे ‘मराठी रंगभूमी दिन’ उत्साहात संपन्न!

Published

on

Spread the love

गोवा खबर:मराठी रंगभूमी हा आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. आपल्या संतांच्या विचारांपासून ते आधुनिक नाटककारांच्या कृतीपर्यंत, रंगभूमीने नेहमीच समाजाला प्रबोधन आणि अचूक दिशा दाखवण्याचे मोठे कार्य केले आहे.आजच्या डिजिटल युगातही रंगभूमीवरील कलाकारांचे आणि संवादांचे आकर्षण टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे.

नावेली सारख्या भागात अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपली भाषा आणि नाट्यसंस्कृती जिवंत ठेवण्याचे स्तुत्य काम ‘सम्राट क्लब नावेली’ करत आहे. असे उद्गार दवर्ली दिकारपाली चे सरपंच श्री. संतोष नाईक यांनी श्री. सिद्ध दत्त मंदिर,दवर्ली येथे काढले.

सम्राट क्लब नावेली ‘च्या वतीने श्री. सिद्ध दत्त मंदिर, दवर्ली-नावेली येथे ‘मराठी रंगभूमी दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी पोलीस खात्याचे पोलीस निरीक्षक श्री. फिलोमिनो कोस्टा हे सन्माननीय अतिथी म्हणून आणि श्री. सिद्ध दत्त मंदिराचे अध्यक्ष श्री. उपेन्द्र मडकईकर तसेच एससी आय स्टेट 1 चे माजी संचालक अप्सर शेख

हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान श्री. अनिल बाबल शिरोडकर आणि श्री. प्रदीप शंकर शेणवी खांडेपारकर या नाट्यकर्मींचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पोलीस खात्याचे पोलीस निरीक्षक श्री. फिलोमिनो कोस्टा यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की आपल्या कलेचे रक्षण करणे ही आज काळाची गरज आहे.सर्व उपस्थित मान्यवरांची यावेळी यथोचित भाषणे झाली. दोन्ही सत्कारमूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी सम्राट क्लब नावेली चे २०२६-२७ चे अध्यक्ष कमलेश कामत, सचिव स्वामिनी प्रभू शिरोडकर, खजिनदार गौरीश जबशेट्टी, संस्थापक अध्यक्ष आदित्य बिद्रे, सदस्य सिद्धार्थ नाईक, देवकी कामत, कविता आमोणकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य बिद्रे यांनी केले. आभार ही त्यांनीच मानले.