Connect with us

गोवा खबर

राज्यात आयुर्वेद सुविधांचा विस्तार : नवीन सुविधांचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी म्हापसा येथील धारगळ येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यात सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी युनिट आणि बोन मिनरल डेन्सिटी युनिटचा समावेश आहे. या नवीन सुविधांमुळे रुग्णांना आधुनिक आणि दर्जेदार आयुर्वेदिक उपचार मिळण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.