Connect with us

गोवा खबर

टॅक्सी ॲग्रिगेटर मसुद्यावरून मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Published

on

Spread the love

गोवा खबर : नवीन डिजिटल टॅक्सी धोरण लागू होताच टॅक्सी ॲग्रिगेटर मसुदा रद्द केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी हे स्पष्ट केले.

टॅक्सी मालकांचा या मसुद्याला तीव्र विरोध होता, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या विषयावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका करत, सरकारकडून टॅक्सी मालकांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे.