Connect with us

गोवा खबर

सरकारकडून तीन वर्षांत इव्हेंट्स आणि कार्यक्रमांवर ६६ कोटींचा खर्च

Published

on

Spread the love

गोवा खबर : गेल्या तीन वर्षांत विविध सरकारी इव्हेंट्स, महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर राज्य सरकारने सुमारे ६६ कोटी ९२ लाख रुपये खर्च केल्याची माहिती विधानसभेतील एका लेखी उत्तरातून समोर आली आहे.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली. यामध्ये जी-२० शिखर परिषद, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त आयोजित कार्यक्रम, पंतप्रधान मोदींच्या भेटीचे कार्यक्रम आणि विविध सरकारी प्रदर्शनांचा समावेश आहे. या खर्चावरून विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.