Connect with us

गोवा खबर

भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी सुवर्णा तेंडुलकर, युवा मोर्चा अध्यक्षपदी तुषार केळकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठी फेरबदल करण्यात आली आहे. प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सुवर्णा तेंडुलकर तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी तुषार केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सात मोर्चांच्या अध्यक्षांची घोषणा केली. ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी प्रदीप शेट, किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी विश्वास चोडणकर, एसटी मोर्चा अध्यक्षपदी मोहन गावकर, एससी मोर्चा अध्यक्षपदी दत्ताराम रेडकर, तसेच अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी हैदर शा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व नियुक्त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंजुरी दिल्यानंतर अधिकृत स्वरूप देण्यात आले आहे. पक्षाच्या संघटनात्मक कार्यात नवे जोश आणण्यासाठी आणि विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून या फेरबदलाला महत्त्व आहे.