गोवा खबर : सेंट थॉमस उच्च माध्यमिक विद्यालय , हळदोणा आणि पालक-शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “Voices of Hope: News that Inspires, Uplifts, and Ignites Optimism” या संकल्पनेवर आधारित अखिल गोवा आंतर-उच्च माध्यमिक विद्यालय बातमी सादरीकरण स्पर्धा विद्यालयाच्या सभागृहात यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेत गोव्यातील १५ उच्च माध्यमिक विद्यालयांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सर्जनशील, प्रभावी आणि पॉवरपॉईंट सादरीकरणांच्या माध्यमातून बातम्या मांडल्या.
प्रमुख पाहुणे प्रमोद आचार्य, संपादकीय संचालक, प्रुडंट मीडिया नेटवर्क यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. काही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अँकर्सपेक्षा उत्कृष्ट कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्या प्रसारित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. “शेवटी वाचकच ठरवतात की कोणती बातमी महत्त्वाची ठरेल,” असे ते म्हणाले.

परीक्षक मंडळात अलिशा कॅरालाइन फर्नांडिस, निर्माता, राष्ट्र टीव्ही व नितिक्षा महादेव गावंकर, वार्ताहर, गोवा ३६५ न्यूज चॅनल यांचा समावेश होता. प्राचार्य ॲजलिका फर्नानडीस हिने विजेत्यांची घोषणा केली वसर्वाचे आभार मानले.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
•प्रथम क्रमांक – जुई मनेश गावस, वसंतराव धेंपे उच्च माध्यमिक विद्यालय, कुजीरा
• द्वितीय क्रमांक – कॅरोल फर्नांडिस, सेंट थॉमस उच्च माध्यमिक विद्यालय हळदोणा
• तृतीय क्रमांक – यश जगदीश दुर्भाटकर, सेंट अँड्रू उच्च माध्यमिक विद्यालय, वास्को
•प्रथम प्रोत्साहन पारितोषिक –
चेतना नाईक, डॉ. के. बी. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालय, कुजीरा
•द्वितीय प्रोत्साहन पारितोषिक – मेगन ग्रेस डायस, जी.व्ही एम उच्च माध्यमिक विद्यालय, फोंडा
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली, तर विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि रोख बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे समन्वय सर डॅरिल जॉन अब्रांचेस व शिक्षिका लाविना परेरा यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जूझे नाझारेथ डिसूझा यांनी स्वागत केले आणि शिक्षक डॅरल आब्रांचीज यांनी आभार व्यक्त केले.
सेंट थॉमस हायअर सेकंडरी स्कूलच्या व्यवस्थापनाने सर्व शाळांचे उत्साही सहभागाबद्दल आभार मानले व हा उपक्रम संस्मरणीय व यशस्वी ठरल्याचे सांगितले.