Connect with us

गोवा खबर

आयआयटीला विरोध का? मुख्यमंत्र्यांचा सवाल

Published

on

Spread the love

गोवा खबर : “आयआयटीला विरोध का करता आहात? चांगल्या प्रकल्पांना विरोध करणे चुकीचे आहे,” असा सवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोडार-बेतोडा येथे होणाऱ्या आयआयटी प्रकल्पावरील स्थानिकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातून अनेक विद्यार्थी बाहेर आयआयटीत शिक्षण घेत आहेत. पालकांनी मुलांच्या भवितव्याचा विचार करून अशा शैक्षणिक प्रकल्पांना पाठिंबा द्यायला हवा. काहीजण विनाकारण विरोध करतात, परंतु विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी मात्र या प्रकल्पामुळे पर्यावरण, जैवविविधता आणि उपजीविकेवर परिणाम होईल असा दावा केला आहे. सरकारने विश्वासात न घेतल्याचा त्यांचा आरोप असून, जनजागृती व स्वाक्षरी मोहिमेद्वारे विरोध सुरू ठेवला आहे.