गोवा खबर : रिवण येथे झालेल्या विजेच्या अपघातात गावकर कुटुंबावर संकट कोसळले. या प्रकरणी आप आमदार क्रुझ सिल्वा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
सिल्वा म्हणाले की, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोकांची सुरक्षितता ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी गावकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि सरकारने त्वरित मदत करावी असे सांगितले.