Connect with us

गोवा खबर

सरकारने गोमंतकीयांच्या तोंडाला ‘कोळसा’ फासला : आप

Published

on

Spread the love

गोवा खबर : रेल्वे दुपदरीकरण आणि कोळसा वाहतुकीच्या प्रकल्पावरून सरकारने जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक अॅड. अमित पालेकर यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना पालेकर म्हणाले, हा प्रकल्प केवळ अदानी आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे, गोव्याला त्याचा कोणताही फायदा नाही. त्यांनी सरकारवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप करत, सर्वांनी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले.

रेल्वे दुपदरीकरणामुळे पर्यावरण, वन्यजीव आणि घरांवर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.