Connect with us

गोवा खबर

चोरीला गेलेले ५० मोबाईल मालकांकडे परत

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर गोवा पोलिसांनी चोरीला गेलेले आणि हरवलेले मिळून ५० मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत दिले आहेत. पोलिस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात या मोबाईलची परतफेड करण्यात आली. या मोबाईल्सची एकूण किंमत तब्बल १५ लाख रुपये आहे.

कलंगुट (३३), पणजी (१४) आणि हणजूण (३) पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टल आणि पोलिसांच्या मेहनतीमुळे हा उपक्रम शक्य झाला.

सीईआयआर पोर्टलमुळे चोरीला गेलेल्या मोबाईलचा IMEI नंबर ब्लॉक करता येतो. त्यामुळे तो मोबाईल सर्व टेलिकॉम नेटवर्कवर बंद होतो. भविष्यातही अशा मोबाईल ट्रेस करून परत देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे पोलिसांनी सांगितले.

ज्यांचे मोबाईल परत मिळाले त्यांनी पोलिसांचे आभार मानले.