Connect with us

गोवा खबर

१०० नॉट आऊट: क्लुब टेनिस द गॅस्पर डायसच्या शताब्दी वर्ष सोहळ्या निमीत्त ‘स्पोर्टस फिएस्टा’ चे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर: शताब्दी वर्षानिमित्त क्लुब टेनिस द गॅस्पर डायस, मिरामार येथे तीन दिवसांचा भव्य स्पोर्ट्स फिएस्टा आयोजित करण्यात आला.

पहिल्या दिवशी स्क्वॉश आणि पिकलबॉलचे रोमांचक सामने झाले. दुसऱ्या दिवशी स्नूकर, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि पिकलबॉलचे सामने रंगले. तिसऱ्या दिवशी अंतिम सामने आणि बक्षीस वितरण सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

क्लबच्या स्पोर्ट्स कमिटीचे चेअरमन साईराज धोंड म्हणाले, “ शताब्दी वर्षा निमीत्त आयोजीत केलेल्या स्पोर्ट्स फिएस्टाने आरोग्य, खेळाडूपणा आणि वेगवेगळ्या पिढ्यांतली लोकांना एकत्र आणले. इतक्या मोठ्या प्रमाणात क्लबचे सदस्य सहभागी होतील अशी अपेक्षा नव्हती. हा उत्सव अधिकच अविस्मरणीय बनला.”


स्पोर्टस फिएस्टामधील खेळांचा अंतिम निकाल: टेबल टेनिसच्या पुरुष गटात दीपक गोपानी विजेते, तर राज लोटलीकर उपविजेते ठरले. बॅडमिंटन पुरुष गटातराजाराम कुंडईकर विजेते व नील फर्नांडिस उपविजेते. पिकलबॉल राजाराम कुंडईकर विजेते तर राजेंद्र गोदिन्हो उपविजेते. बॅडमिंटन महिला गटात एलीझा फर्नांडिस विजेत्या व प्रीती उपविजेत्या. टेबल टेनिस महिला गटात रोशनी गोपानी विजेत्या तर फरनाक ब्रागांझा उपविजेत्या. पिकलबॉल महिला गटात सिम्रन नाडकर्णी विजेत्या तर कार्मेन गोदिन्हो उपविजेत्या ठरल्या.

तसेच, बक्षिस वितरण समारंभाच्या वेळेस सहा वर्षीय आदी झारापकरचे सर्वात लहान सहभागी म्हणून विशेष बक्षिस देउन उत्तेजन वाढवले. ८३ वर्षीय अविनाश पै रायतुरकर यांना सर्वात ज्येष्ठ सहभागी, राजाराम कुंडईकर यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू व राजेन्द्र आणि कार्मेना गोदिन्हो यांना  सर्वोत्कृष्ट सदस्य खेळाडूंची जोडीचे खास बक्षिस देउन सन्मानित करण्यात आले.