गोवा खबर : पर्वरी येथील सहापदरी उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी मॉल दी गोवा ते ओ-कोकेरो जंक्शनदरम्यानचा रस्ता सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
24 ऑगस्टपासून 31 जानेवारी 2026 पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. ऐन गणेशोत्सव काळात हा निर्णय घेतल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग आणि दिशादर्शक फलक लावले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली आहे.