Connect with us

गोवा खबर

झेडपी निवडणुकीसाठी मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू

Published

on

Spread the love
  • राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी : ११ सप्टेंबरपर्यंत सीमांकनाचा मसुदा

गोवा खबर : जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगाने मतदारसंघांच्या फेररचनेची प्रक्रिया हाती घेतली आहे. यासंबंधीची अधिसूचना राज्य निवडणूक आयुक्त दौलतराव हवालदार यांनी जारी केली.

डिसेंबरमध्ये विद्यमान झेडपींचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर कधीही निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे आयोगाने वेळेआधी काम सुरू केले आहे.

सध्या राज्यात एकूण ५० मतदारसंघ असून त्यापैकी उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी २५ मतदारसंघ आहेत. नवी फेररचना १ जानेवारी २०२५ रोजीच्या विधानसभा मतदार यादीवर आधारित असेल.

या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी संबंधित तालुक्यांतील मामलेदारांच्या मदतीने निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून काम करतील. मतदारसंघनिहाय नकाशे तयार करून त्याचा मसुदा प्रस्ताव ११ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.