-
नगरगाव आणि मोर्ले येथे झालेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
गोवा खबर : सत्तरी तालुका आणि उसगाव भागातील तब्बल ३३ हजार कुटुंबांना आरोग्यमंत्री व आमदार विश्वजीत राणे आणि आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या वतीने गणेश चतुर्थीपूर्वी विशेष गिफ्ट देण्यात आले.
नगरगाव आणि मोर्ले येथे झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर कडधान्य, तेल व इतर जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या वेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले, सत्तरीच्या सर्वांगीण विकासासाठीच मी राजकारण करत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांना आनंद वाटावा आणि त्यांच्या चुली सतत पेटत्या राहाव्यात यासाठी आम्ही मदतीचा हात दिला आहे. पुढील काळात रोजगाराचे प्रश्नही सोडवले जातील.
राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कामाचे कौतुक करताना म्हटले की, त्यांनी केलेल्या कायद्यांमुळे सामान्य लोकांच्या घरांना कायदेशीर मान्यता मिळेल. त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल.
दरम्यान, उसगाव, नगरगाव, मोर्ले, पर्ये, वाळपई, सावर्डे आणि आसपासच्या सर्व भागांमध्ये ‘चतुर्थी भेट’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांत डॉ. दिव्या राणे यांनीही सहभाग घेतला.