Connect with us

गोवा खबर

न्हावेली पंचायत क्षेत्रात कचरा फेकणाऱ्यांना दहा हजार दंड

Published

on

Spread the love

गोवा खबर : न्हावेली साखळी पंचायत क्षेत्रात उभारण्यात आलेल्या एमआरएफ शेड आणि नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वतः घ्यावी असे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकताना कोणी आढळल्यास थेट दहा हजार रुपयांचा दंड होणार आहे. तसेच एखादे वाहन तीन वेळा कचरा फेकताना सापडल्यास त्या वाहनाचा परवाना रद्द करून वाहन कायमस्वरूपी पोलिसांच्या जप्तीत राहील.

गाव स्वच्छ ठेवण्यासाठी कोणीही आपला घरगुती कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत न टाकता थेट पंचायत कार्यालयाकडे द्यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.