गोवा खबर : गणेश उत्सवानिमित्त वाळपई मतदारसंघात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ‘कडधान्य भेट’ कार्यक्रम आयोजित केला. उसगावासह विविध भागात झालेल्या या उपक्रमात सात हजार कुटुंबांना साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना मंत्री राणे म्हणाले, उसगावातील सर्व घरे लवकरच कायदेशीर होतील. माझ्या कार्यकाळात येथील एकही घर पाडले जाणार नाही. तसेच शहरातील सर्व सोयी-सुविधा या भागाला उपलब्ध करून दिल्या जातील.
मंत्री राणे यांनी गणेश चतुर्थीनंतर दर आठवड्याला मतदारसंघातील नागरिकांना भेटण्यासाठी उसगाव कार्यालयात उपस्थित राहण्याची घोषणा केली.