Connect with us

गोवा खबर

नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा लादू नये : लोबो; ‘सिंगल विंडो’ प्रणालीची शिफारस

Published

on

Spread the love

गोवा खबर : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा लादू नये असे सांगितले. ते म्हणाले, नागरिकांना विविध ठिकाणी कराच्या रूपात शुल्क जमा करावे लागते, ज्यामुळे त्यांना अडचणी येतात. त्यामुळे सरकारने सर्व कर सिंगल विंडो पद्धतीने एकत्र जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून अडचण कमी करावी.

मार्च २०२२ रोजी सरकारने घरपट्टी, व्यवसाय कर आणि इतर विविध करांचा फेर आढावा घेणारी अधिसूचना जारी केली होती. किनारी भागातील नागरिकांवर अधिसूचनेनुसार अतिरिक्त कर लावल्यास ते त्यांना परवडणार नाही, असे लोबो यांनी सांगितले.

लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पंचायतीने या विषयावर विशेष ग्रामसभा बोलावली आहे. नागरिकांनी हा विषय ग्रामसभेत न घेता पंचायत मंडळाच्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशी सूचना लोबो यांनी दिली. त्यांनी सिंगल विंडो प्रणाली लागू करून सर्व शुल्क एकत्र जमा करणे सोयीस्कर व्हावे, असेही सांगितले.