Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांनी पत्रादेवी येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

Published

on

Spread the love

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणे पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित कार्यक्रमात  तिरंगा फडकविला आणि नंतर हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आणि संचलनाची पाहणी केली व पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली.

             पुढे बोलताना हुतात्मा स्मारकाचे काम १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि ते पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांची माहितीही कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केली जाईल असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विकसित भारत २०४७ च्या वचनबद्धतेमध्ये प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आणि संकल्प स्पष्ट आहेत असे सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांनी सहकार्य देण्याचे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्र्यांनी मेक इन इंडिया संकल्पनेवर भर दिला आणि समाजामध्ये तसेच व्यक्तींमध्ये स्वयंपूर्ण आणि स्थानिक पातळीवर उत्पादित वस्तूंच्या वापरावर भर देणारी स्वदेशीची भावना जोपासण्याचा सल्ला दिला.

            स्वातंत्र्य दिन हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्वांचे स्मरण करण्याचा एक पवित्र प्रसंग आहे असे डॉ. सावंत म्हणाले आणि देश विकासात वेगाने प्रगती करीत आहे आणि जगात एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास येत आहे हे जाणून आनंद झाला असेही ते म्हणाले.

            मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी ३५००० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत असे सांगितले.

            आमदार श्री प्रवीण आर्लेकर, गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री रोहिदास देसाई, तोरसेच्या सरपंच श्रीमती छाया शेट्ये, आयएएस उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्री अंकित यादव आणि इतर स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

            कु. उत्कर्षा भुस्कुटे यांनी सूत्रसंचालन केले.