Connect with us

गोवा खबर

आता श्रीलंकेतही मिळणार भारतीय ‘कॅम्पा’

Published

on

Spread the love

गोवा खबर : रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने श्रीलंकेत भारतीय पेय ब्रँड ‘कॅम्पा’ लाँच केला आहे. यासाठी कंपनीने ‘एलिफंट हा ऊस’ ब्रँडचे निर्माते ‘सीलोन कोल्ड स्टोअर्स’ यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आता श्रीलंकन ग्राहकांनाही किफायतशीर दरात कॅम्पाचा आस्वाद घेता येणार आहे.

श्रीलंकेतील कॅम्पा पोर्टफोलिओमध्ये कॅम्पा कोला, लेमन, ऑरेंज तसेच कॅम्पा एनआरजी गोल्ड बूस्ट आणि बेरी किक यांसारखी ऊर्जा श्रेणी उपलब्ध असेल. 250 मिलीलीटरच्या बाटलीची किंमत ₹100/- निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने एलिफंट हाऊस बेव्हरेजेस भारतीय बाजारात यशस्वीपणे सादर केली होती.

या भागीदारीबाबत रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक केतन मोदी म्हणाले, “आमचे महत्त्वाचे भागीदार ‘एलिफंट हाऊस बेव्हरेजेस’ यांच्यासह श्रीलंकन बाजारपेठेत प्रवेश करताना आम्हाला आनंद होत आहे. कॅम्पा हा 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेला एक जुना भारतीय ब्रँड आहे, जो आजही ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. आम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कटिबद्ध आहोत आणि या क्षेत्रात जलद गतीने वाढ होण्याच्या प्रचंड संधी आम्हाला दिसतात. ग्राहकांना योग्य आणि परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट व जागतिक दर्जाचे उत्पादने देण्याचा आमचा उत्तम विक्रम आहे.”

श्रीलंकेतील ‘सीलोन कोल्ड स्टोअर्स’ ही प्रत्यक्षात ‘जॉन कील्स’ समूहाची सहाय्यक कंपनी आहे. कॅम्पाच्या लाँच प्रसंगी जॉन कील्स कंझ्युमर फूड्स सेक्टरचे अध्यक्ष दामिंदा गमलाथ म्हणाले, “श्रीलंकेत कॅम्पा बेव्हरेजेस आणण्यासाठी अग्रगण्य जागतिक समूह रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्ससोबत सहकार्य करताना आम्हाला अभिमान वाटतो. ही भागीदारी ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचे, विविध पेय पर्याय उपलब्ध करून देण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. हा रणनीतिक करार आमच्या पेय पोर्टफोलिओचा विस्तार तर करेलच, पण देशातील स्पर्धात्मक पेय बाजारात एक महत्त्वाचा स्थानिक खेळाडू म्हणून आमची भूमिका अधिक बळकट करेल.”