गोवा खबर : राज्यात शाश्वत खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली असून आतापर्यंत १२ खाण लिजांचा लिलाव पूर्ण झाला आहे, त्यापैकी तीन लिजांमध्ये व्यवसाय सुरू झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.
आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी या प्रश्नावर चर्चा करताना खाण व्यवसायाची सद्यस्थिती जाणून घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, पुढील १५ दिवसांत चार खाण लिजांचा ई-लिलाव होईल आणि ऑक्टोबरपासून खनिज डंप लिलाव प्रक्रियाही सुरू होईल. यासाठी चार खासगी कंपन्यांनी रस दाखवला आहे.