Connect with us

गोवा खबर

घोडेमोडणी’ उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा द्या : दिव्या राणे यांची मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : सत्तरीतील पारंपरिक घोडेमोडणी उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा द्यावा, अशी मागणी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विधानसभेत केली. त्यांनी पर्यटन आणि आयटी विभागाच्या अनुदानावर चर्चा करताना ही मागणी मांडली.

त्या म्हणाल्या, काजू महोत्सवासारखेच, पारंपरिक उत्सवांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे गोवा पर्यटन दिनदर्शिकेत घोडेमोडणी उत्सवाचा समावेश करावा.

सत्तरी तालुक्याच्या दुर्गम भागात होमस्टे विकसित करण्याची मागणी करत त्यांनी सांगितले की, स्थानिक समुदायालाच ही व्यवस्थापनाची जबाबदारी दिल्यास रोजगारनिर्मिती होईल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. याशिवाय त्या भागात नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले.