Connect with us

गोवा खबर

धारगळ प्रकल्पासाठी ‘काडा’ची मान्यता अनिवार्य : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : धारगळ येथे प्रस्तावित असलेल्या डेल्टा कॉर्प कंपनीच्या हॉस्पिटॅलिटी प्रकल्पाला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (IPB) अंतिम मंजुरी कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (CADA) कडून मंजुरी मिळाल्यानंतरच दिली जाईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी धारगळमधील तिलारी प्रकल्पासाठी अधिसूचित असलेली जागा कशा प्रकारे डेल्टा कॉर्पला दिली गेली यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी नमूद केलं की, तिलारी प्रकल्पाचं पाणी बार्देश, पेडणे आणि डिचोली तालुक्यांना दिलं जातं. त्यामुळे ही जमीन पर्यटन प्रकल्पासाठी वापरणे योग्य नाही.

मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले, ही जमीन सरकारने दिलेली नसून शेतकऱ्यांनी स्वत:हून दिली आहे. मात्र, जमीन तिलारी कमांड एरियामध्ये असल्यामुळे ‘काडा’ची मान्यता घेतल्याशिवाय कुठलीही कार्यवाही केली जाणार नाही. जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही यासंदर्भातली बैठक १५ ऑगस्टपूर्वी घेण्यात येईल असे स्पष्ट केले.