Connect with us

गोवा खबर

छपाई व मुद्रण खात्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री : खंवटे

Published

on

Spread the love

गोवा खबर : जुनी यंत्रे बाजूला सारून नवी ऑफसेट यंत्रणा छपाई खात्यासाठी आणली आहे, असे छपाई आणि मुद्रण खात्याच्या अनुदान मागण्यांबाबत बोलताना या खात्याचे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी नवी यंत्रणा लवकरच खरेदी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पारंपरिक यंत्रणेपासून हे खाते मुक्त करून नव्या तंत्रज्ञान बदलांशी त्याला सुसंगत करण्याचा विचार करून पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. इ सरकारी राजपत्र या खात्याने प्रकाशित करणे सुरू केल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

या खात्याचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. त्यासाठी वेर्णा येथे भूखंडही घेतला असून लवकरच या खात्यासाठी स्वतंत्र इमारतही उभी राहील असे आश्वासन खंवटे यांनी दिले.