गोवा खबर : विधानसभेत १९४८ च्या कारखाने कायद्यात दुरुस्ती करून दररोज नऊ ऐवजी दहा तास काम करण्यास कामगारांना परवानगी देण्यात आली आहे.
ओव्हरटाईम मर्यादा तिमाहीत १२५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या बदलामुळे कामगारांना अधिक ओव्हरटाईमचा लाभ मिळणार असून, सरकारच्या मते हा कायदा कामगार हिताचा आहे.