गोवा खबर : विन्सन वर्ल्ड आयोजित गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा दोन दिवसांचा सोहळा ९ व १० ऑगस्ट रोजी पणजी येथील आयनॉक्स चित्रगृह आणि मॅक्विनेझ पॅलेस येथे पार पडणार आहे.
या महोत्सवात कुठेही प्रदर्शित न झालेले कमीतकमी चार चित्रपट सादर केले जातील. तसेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले परंतू गोव्यात प्रदर्शित न झालेले असे एकूण सोळा ते सतराहून अधिक मराठी चित्रपट सादर केले जातील.
हा महोत्सव यंदा आयनॉक्स व मॅकेनिझ पॅलेस चित्रपटगृहात होणार असून शुक्रवार 25 जुलैपासून प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध केल्या जातील.
नोंदणीसाठी ठिकाणे व माहिती
प्रत्यक्ष नोंदणीसाठी खालील ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे (25 जुलैपासून) :
पणजी – विन्सन ग्राफिक्स, गेरा इम्पेरियम २, कार्यालय क्रमांक ३०९, पट्टो
वास्को – विन्सन ग्राफिक्स, हॉटेल अनंताश्रमजवळ
मडगाव – माया पुस्तक भांडार, विट्रोस मॅन्शन, इसिडोर बाप्तिस्ता मार्ग
फोंडा – मोहक डिझायन, नूतन औषधालयाशेजारी
ऑनलाइन नोंदणी ‘बुर्रा’ नावाच्या ऍप वेबसाईटवर चालू आहे.