गोवा खबर : जुने गोवे येथे अटकेत आलेल्या ‘आयेशा’ प्रकरणावर विधानसभा सभागृहात जोरदार चर्चा झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले की, राज्यात जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांविरोधात स्वतंत्र कायदा आणण्याचा सरकार विचार करत आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, भाडेकरूंनी जर गुन्हेगारी कृत्ये केली, तर संबंधित घरमालकावरही कारवाई होईल. आतापर्यंत ६६ हजार भाडेकरूंची पडताळणी झाली आहे. आमदार बोरकर यांच्या मागणीनुसार भाडेकरू पडताळणीसाठी विशेष कक्ष उभारण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.