Connect with us

गोवा खबर

कोळसा प्रश्नावर युरी आलेमाव यांचा आक्षेप

Published

on

Spread the love

गोवा खबर : कोळसा हाताळणीवर विचारला गेलेला तारांकित प्रश्न अचानक अतारांकित करण्यात आल्यामुळे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभा सभागृहात आक्षेप घेतला. त्यांनी सभापतींकडे या निर्णयामागचे कारण मागितले.

सरकार अदानींची सोय पाहते, जनतेची नाही, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावर उत्तर देताना, विरोधकांना सभागृहाचे कामकाज चालू द्यायचे नाही, असा आरोप केला. वादाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ सुरू असतानाच पहिला प्रश्न पुकारण्यात आला आणि कामकाज पुढे सुरू झाले.