Connect with us

गोवा खबर

शिक्षक भरतीसाठी ४५० पदांचा प्रस्ताव आयोगाकडे

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये सध्या ८३८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यापैकी सुमारे ४५० पदे भरण्यासाठी शिक्षण खात्याने कर्मचारी निवड आयोगाकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात दिली. आमदार वेंझी व्हिएगस यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

रिक्त पदांचा तपशील :

प्राथमिक शिक्षक – ३४७

सहायक शिक्षक – २०८

शिक्षक ग्रेड १ व शिक्षण अधिकारी – २११

मुख्याध्यापक – २६

चित्रकला शिक्षक – २९

प्रशिक्षित इंग्रजी शिक्षक – १४

संगणक शिक्षक – ३

यातील ३१८ प्राथमिक व ११८ सहायक शिक्षकांची पदे कर्मचारी निवड आयोगामार्फत भरली जाणार आहेत. प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची १४ पदेही लवकरच भरली जातील, असे सरकारचे म्हणणे आहे.