गोवा खबर : सभापती रमेश तवडकर यांच्याविषयी आमदार विजय सरदेसाई यांनी केलेल्या विधानाचा भाजपने तीव्र निषेध केला. सभापती हे कोणाच्याही हातातील बाहुले नाहीत आणि त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप करणे हे चुकीचे आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भाजपच्या बैठकित सभापती तवडकर यांची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान विरोधी पक्षाच्या कामकाजावर चर्चा झाली. सरदेसाई यांच्या आरोपानुसार, तवडकर या बैठकीस पूर्णवेळ उपस्थित होते, पण प्रत्यक्षात ते बैठक संपल्यानंतरच आले होते, असे स्पष्ट करत फळदेसाई यांनी सरदेसाईंना अपुरी माहिती असल्याचे सांगितले.

सभापतींनी नेहमीच विरोधकांना जास्त वेळ दिला असून, त्यांचा सन्मान राखला आहे. तरीही अशा आरोप करणे निषेधार्ह आहे, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही नमूद केले.
दरम्यान, सरदेसाईंनी आयोजित केलेल्या ‘दरबार’ कार्यक्रमात राज्य सरकारने एसटी समाजात फूट पाडल्याचा आरोप केला होता. मात्र, सरकारने नव्हे, तर विविध एसटी संघटनांच्या मागणीवरून संबंधित बंदी लादण्यात आल्याचे भाजपने स्पष्ट केले.