-
टॅक्सी प्रश्नासाठी समिती स्थापन; स्थानिकांचे मत महत्त्वाचे : भाजप प्रदेशाध्यक्ष
गोवा खबर : गोव्यातील टॅक्सी व्यवसायाच्या प्रश्नावर आयएएस अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती आणि अनुभव नसल्यामुळे अनेकदा निर्णय अडचणीत येतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, टॅक्सी व्यवसायासाठी अॅप अॅग्रिगेटर संदर्भात सरकारने ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन टॅक्सीचालक, प्रवासी आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया घेईल आणि अहवाल सादर करेल.
महानगरांसारख्या दिल्ली, मुंबईतील टॅक्सी प्रणालीशी गोव्याची तुलना करता येणार नाही. येथे टॅक्सीवाल्यांना परतीचा ग्राहक मिळत नाही, असे सांगत त्यांनी स्थानिकांसाठी विशेष धोरण आखण्याचे आवाहन केले.
९० जण एक मत देतील आणि १० जण दुसरे, तर लोकशाहीत बहुसंख्यांचे मत मान्य करावे लागेल, असे सांगत त्यांनी जनतेच्या मताला सर्वोच्च महत्त्व दिले.