Connect with us

गोवा खबर

२ ऑगस्ट रोजी हरमल आणि फोंडा पंचायतीतील प्रभागांमध्ये पोटनिवडणुका जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणे तालुक्यातील हरमल येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ आणि फोंडा तालुक्यातील दुर्भाट येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ या रिक्त झालेल्या पदांसाठी  गोवा राज्य निवडणूक आयोगाने २ ऑगस्ट रोजी पोटनिवडणुका  जाहीर केल्या आहेत. मतमोजणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. आदर्श आचार संहिता ११ जुलैपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वरील उल्लेखित ग्रामपंचायतींच्या प्रभागांच्या भागात लागू राहील.

उमेदवारी अर्ज  मंगळवार १५ ते २२ जुलै २०२५ पर्यंत स्वीकारण्यात येईल. २३ जुलै २०२५ अर्जांची छाननी  होईल. २४ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येईल.  २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. ४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल.