Connect with us

गोवा खबर

२०२६ पर्यंत राज्य होणार मलेरियामुक्त : आरोग्यमंत्री राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा राज्य मलेरिया निर्मूलनाच्या अंतिम टप्प्यात असून, २०२५-२६ पर्यंत गोवा मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट आरोग्य खात्याने निश्चित केले आहे. ही कामगिरी गाठण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

राज्यात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात झालेली प्रगती लक्षात घेता, दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी २०२२, २०२३ आणि २०२४ या तीन वर्षांसाठी ‘सब-नॅशनल मलेरिया एलिमिनेशन’ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. गोव्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी ही एक गौरवाची बाब असल्याचे राणे यांनी सांगितले.

बांधकाम स्थळांवरील मजुरांची आरोग्य तपासणी आणि मलेरिया चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच सर्व विभागांनी स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश आरोग्य संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.

या उपक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी सामाजिक सहभाग महत्वाचा असून, डासजन्य रोगांचे निर्मूलन हा सर्वांचा सामूहिक प्रयत्न असायला हवा, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले.