Connect with us

गोवा खबर

११ वर्षांचा भाजप काळ म्हणजे विकासाचा पाया : तानावडे

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रातील भाजप सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी म्हापशात भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी भाजपने देशात पारदर्शक, जबाबदारीपूर्ण आणि लोककल्याणकारी शासन दिल्याचा दावा केला.

भ्रष्टाचारमुक्त कारभार, योजनांची अमलबजावणी

तानावडे म्हणाले की, भाजपने कोणत्याही पक्षपाती भूमिकेशिवाय सर्व राज्यांना विकास योजनांचा लाभ दिला. डबल इंजिन सरकारच्या मदतीने अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले गेले.

दक्षिण भारतातही वाढते समर्थन

ते म्हणाले की, जिथे भाजप सत्तेत नाही तिथेही भाजपच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. विशेषतः दक्षिण भारतात पक्षाचा विस्तार होतोय, हे परिवर्तनाचे संकेत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष दयानंद कारबोटकर आणि महासचिव रुपेश कामत हे उपस्थित होते.