Connect with us

गोवा खबर

वास्कोत फेरीत मांसाहार बंद; नियम मोडल्यास ५० हजार दंड

Published

on

Spread the love

गोवा खबर : दामोदर भजनी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मुरगाव नगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सप्ताहाच्या फेरीत चिकन आणि मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीस पूर्ण मनाई करण्यात आली असून, नियम मोडल्यास ५० हजार रुपये दंड आणि फेरी परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे.

यंदा ३० जुलै रोजी देव दामोदराचा १२६ वा भजनी सप्ताह साजरा होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कडक पावले उचलण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गोबी मंच्युरियनवरही बंदी

फेरीत गोबी मंच्युरियन विक्रीवर देखील आक्षेप घेण्यात आला असून, असे पदार्थ विकणाऱ्यांवर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी दिली.

महसूल लक्ष्य कायम, शुल्क वाढ नाही

गेल्यावर्षी फेरीतून पालिकेला १.१२ कोटींचा महसूल मिळाला होता. यंदाही तेवढ्याच रकमेचे लक्ष्य असून, दुकान परवाना शुल्कात वाढ केली जाणार नाही.

२५ जून रोजी नियोजन बैठक

सप्ताह काळात होणारी गर्दी आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता २५ जून रोजी सप्ताह समिती, पोलिस, आणि अधिकारी यांची एकत्र बैठक आयोजित करण्यात येणार आहे.