Connect with us

गोवा खबर

सरकारी कर्मचाऱ्यांना योगदिनात सहभागी होणे सक्तीच

Published

on

Spread the love

गोवा खबर : सर्वसामान्य प्रशासन खात्याने सर्व कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी आपल्या संबंधित कार्यालय परिसरात किंवा आपल्या जवळच्या परिसरातील शाळा, महाविद्यालये, पंचायती, नगरपालिका किंवा इतर संस्थांमध्ये आयोजित होणाऱ्या योग सत्रांमध्ये सक्तीने सहभागी होण्याचा आदेश दिले आहे.

तसेच आपल्या खात्याचे कार्यालय किंवा संस्थेच्या बाहेर सत्रांना उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभागाचा पुरावा म्हणून स्वतःचा फोटो काढावा आणि तो त्यांच्या संबंधित खाते प्रमुख, कार्यालयाकडे सादर करावा.

त्याचप्रमाणे, सर्व खाते प्रमुख, कार्यालये, स्वायत्त संस्था, महामंडळाच्या प्रमुखानी आपली खाती आणि उप-कार्यालयांनी २१ जून २०२५ रोजी योग सत्रे आयोजित करण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि शक्य तितक्या आणि आवश्यक सेवांमध्ये अडथळा न आणता, योग सत्रे आयोजित करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधणाऱ्या खाली सूचीबद्ध संस्थांना त्यांचे कार्यालय परिसर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २१ जून २०२५ रोजी त्यांच्या संबंधित खाते आणि उप-कार्यालयांमध्ये प्रत्येक कार्यक्रमाची नोंदणी yoga.ayush.gov.in/yoga-sangam वर अपलोड करावी. सर्व खाती, कार्यालय, स्वायत्त संस्था, महामंडळाच्या प्रमुखांनी आपल्या कार्यालयांनी योग सत्र आयोजित करण्यासाठी खालील कोणत्याही संघटणेकडे संपर्क करावा.

भारत स्वाभिमान ट्रस्ट, सांत इनेज, पणजी, कमलेश बांदेकर – अध्यक्ष – ९७६६६२११९६,  तपोभूमी योग गुरुकुल, कुंडई, फोंडा, गोवा, ज्ञानेश्वर पाटील – अध्यक्ष – ९१३००६६३६२/७५०७७७१७५० आर्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गनायझेशन गोवा, दवर्ली, मडगाव. श्रद्धा चंद्रकांत परब गोवा राज्य समन्वयक – ९४२३३०७८०९, ब्रह्मा कुमारी, पर्वरी, शोभा बहेन – ९३२५१०८२४७,  पतंजली योग सांतीनेज पणजी विश्वास कोरगांवकर -९७६६६२११९०. महिला पतंजली योग समिती, सांतिनेज, पणजी, संध्या खानोलकर – अध्यक्ष – ९७६६६२११९०.

योगासना स्पोर्ट्स असोसिएशन गोवा, डिचोली अध्यक्ष सौ. सुलक्षणा सावंत, सचिव संदेश बराजणकर -९८२३५२४७४३. अंबिका योग कुटीर गोवा, गोगळ हाउसिंग बोर्ड, मडगाव, विश्वनाथ स्वार – उपाध्यक्ष – ९४२२४४२८३८, ९२८४३७९३४७.

प्रति योगयान, दुर्गावाडो, डोना पावला, निशिता गांधी – संचालक/मुख्य शिक्षिका – ८३८००७५५९९. ईशा फाऊंडेशन, गोवा, दामोदर कोचकर – सेक्टर समन्वयक – ९८२२१००३०५. पीस अँड ब्लिस असोसिएशन, गोगळ हाउसिंग बोर्ड, मडगाव, विश्वनाथ स्वार ९४२२४४२८३८, ९२८४३७९३४७

ओम नित्य दिव्य योगाश्रम, बेतोडा, फोंडा, हेमंतकुमार गावेकर – ९६३७३९७३९३. गोवा कौन्सिल ऑफ आयुर्वेद अँड अदर अलाईड इंडियन सिस्टीम्स ऑफ मेडिसिन, मोंत हिल, मडगाव, डॉ. स्नेहा भागवत – अध्यक्ष – ९०११८३४६२६. गोमंत आयुर्वेद महाविदयालय डॉ. अनुरा बाळे – प्राचार्य – ७८७५४४९७५१. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, धारगळ, डॉ. संजय खेडेकर – नोडल ऑफिसर -९५९५७४४७८८.