Connect with us

गोवा खबर

गोवा कोकणी अकादमीकडून नवीन सर्वसाधारण मंडळासाठी अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा कोकणी अकादमीने पुढील ३ वर्षांसाठी म्हणजेच (२०२५-२०२८) नव्या सर्वसाधारण मंडळाची स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अकादमीच्या संविधानाच्या कलम १०.१ नुसार कोकणी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाकडून अर्ज मागविले आहेत.

संस्थांनी गेल्या ५ वर्षांच्या कामकाजाचा अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे, अकादमीच्या सर्व साधारण मंडळामध्ये प्रतिनिधित्व करण्यास इच्छिणाऱ्या व्यक्तीने आपला अर्ज गोवा कोंकणी अकादमी संचार भवन, ५ वा मजला, बीएसएनएल पाटो प्लाझा पणजी येथे  कार्यालयीन वेळेत ११ जून २०२५ पर्यंत सादर करावे.

अधिक माहितीसाठी मारिया वाझ यांच्याशी अकादमीच्या कार्यालयातील फोन क्रमांक ७७७५८९१८५७ वर सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५ या वेळेत संपर्क साधावा.