Connect with us

गोवा खबर

मराठी राजभाषेसाठी नव्या शक्तींचा निर्धार : राज्यभर संमेलने होणार

Published

on

Spread the love

गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीने ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ‘मराठी युवाशक्ती’ व ‘मराठी मातृशक्ती’ संमेलने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वी एप्रिल ते जूनदरम्यान १८ विभागांत झालेल्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी आयोजनानंतर हा पुढील टप्पा असेल.

जुलै महिन्यात नव्याने निवडलेल्या समित्या राज्यातील मामलेदारांना मराठी राजभाषेबाबत निवेदन देतील. याशिवाय, १७५ ग्रामपंचायत समित्यांचे गठन जुलैअखेरपर्यंत पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली आहे.