Connect with us

गोवा खबर

गोव्यात १९८ कोटींच्या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी

Published

on

Spread the love
  • पर्वरीत होणार अत्याधुनिक टाऊन स्क्वेअर; फर्मागुडीला शिवाजी महाराजांचे संग्रहालय

गोवा खबर : राज्याच्या सांस्कृतिक व पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गोवा सरकारने तब्बल १९८ कोटी रुपये खर्चाच्या तीन भव्य प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली.

या प्रकल्पांमध्ये पर्वरीत उभारण्यात येणारा १०० कोटींचा ‘टाऊन स्क्वेअर’, तोर्डा खाडीच्या सौंदर्यीकरणासाठी २४ कोटींचा खर्च, आणि फर्मागुडी येथे होणारे ६४ कोटींचे ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हे प्रकल्प गोमंतकीय सांस्कृतिक वारसा जतन करत पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्था यांना गती देतील.

पर्वरीचा टाऊन स्क्वेअर : आधुनिकतेची अनुभूती

पाच वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेल्या या टाऊन स्क्वेअरमध्ये ३ अॅम्फीथिएटर, तळघर पार्किंग, हेरिटेज कोर्ट, मार्केट कोर्ट, मल्टीफंक्शनल फूड कोर्ट, फाउंटन व म्युझिकल फाउंटन, फ्ली मार्केट, स्पोर्ट्स कोर्ट, कारागिरांची दुकाने, अशा सुविधा असणार आहेत.

केंद्र सरकारच्या विशेष भांडवली सहाय्य योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तोर्डा खाडीचं सौंदर्य खुलणार

तोर्डा खाडीच्या आजूबाजूचा परिसर अधिक आकर्षक करण्यासाठी सौंदर्यीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे. फूड रॉक्स, सुलभ रस्ते आणि देखण्या सुविधा याचा यात समावेश असेल.

शिवाजी महाराज संग्रहालय : गौरवशाली इतिहासाचे दर्शन

फर्मागुडी येथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, सैनिकी पराक्रम आणि ऐतिहासिक वाटचाल यांचं प्रदर्शन उभारण्यात येईल.

भाषा पुरस्कारांची घोषणा : गोव्यातील साहित्यिकांचे योगदान गौरवले जाणार

राज्य सरकारच्या राजभाषा संचालनालयाने मराठी व कोंकणी भाषा पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. ३० मे रोजी कला अकादमीत या पुरस्कारांचे वितरण होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते सन्मान प्रदान केला जाईल.

कोकणी पुरस्कार

२०२२-२३: माणिकराव नायक गावणेकर

२०२३-२४: सुरेश रामचंद्र पै

२०२४-२५: भिकू बोमी नायक

मराठी पुरस्कार

२०२२-२३: शंभू भाऊ बांदेकर

२०२३-२४: अनिल गजानन सामंत

२०२४-२५: रमेश दत्ताराम वंसकर

या निवडी तज्ज्ञ समितीने प्राप्त नामांकनांच्या आधारावर केल्या आहेत.

Continue Reading