गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संध्याकाळी (28 एप्रिल 2025) रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित नागरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात वर्ष 2025 साठीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री, तसेच अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.