गोवा खबर : सुधारित वेळापत्रकानुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) त्वरित अंदाज आता दर महिन्याच्या 28 तारखेला (किंवा 28 तारखेला सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी) प्रसिद्ध केला जाईल. स्त्रोत एजन्सी ज्या उत्पादक कारखाने/आस्थापनांकडून डेटा प्राप्त करतात, त्यांच्याकडून मिळालेल्या आकडेवारीसह निर्देशांक संकलित केला जातो.आयआयपीच्या सुधारित धोरणानुसार या त्वरित अंदाजांमध्ये पुढील प्रसिद्धीदरम्यान सुधारणा केल्या जातात.
ठळक वैशिष्ट्ये
- मार्च 2025 महिन्यासाठी आयआयपी वाढीचा दर 3.0 टक्के आहे जो फेब्रुवारी 2025 मध्ये 2.9 टक्के (त्वरित अंदाज) होता.
- मार्च 2025 महिन्यासाठी खाणकाम, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचा विकास दर अनुक्रमे 0.4 टक्के, 3.0 टक्के आणि 6.3 टक्के आहे.
- आयआयपीचा त्वरित अंदाज मार्च 2024 मधील 160.0 च्या तुलनेत 164.8 आहे
- उत्पादन क्षेत्रात, एनआयसी 2 अंकी स्तरावर 23 पैकी 13 उद्योग समूहांनी मार्च 2025 मध्ये मार्च 2024 च्या तुलनेत सकारात्मक वाढ नोंदवली आहे. मार्च 2025 महिन्यासाठी आघाडीचे तीन सकारात्मक योगदानकर्ते आहेत – “मूलभूत धातूंचे उत्पादन” (6.9%), “मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी -ट्रेलरचे उत्पादन” (10.3%) आणि “इतर इलेक्ट्रिकल उत्पादन” (15.7%)
- उद्योग समूहात, “मूलभूत धातूंचे उत्पादन” या उद्योग गटात, “मिश्र पोलाद स्टीलचे फ्लॅट उत्पादने”, “पोलादी पाईप्स आणि ट्यूब्स”, “सौम्य पोलाद बार आणि रॉड्स” या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
- “मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलरचे उत्पादन” या उद्योग गटात, “वाहन उद्योगातील घटक/सुटे भाग आणि अॅक्सेसरीज”, “अॅक्सल”, “ट्रक, लॉरी आणि ट्रेलर बॉडीज” या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
- “विद्युत उपकरणांचे उत्पादन” या उद्योग गटात “इलेक्ट्रिक हीटर्स”, “ट्रान्सफॉर्मर्स लघु)”, “ऑप्टिकल फायबर आणि केबल्ससाठी एंड फेसिंग कनेक्टर” या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
- वापर आधारित वर्गीकरणानुसार, मार्च 2025 मध्ये प्राथमिक वापराच्या वस्तूंसाठीचा निर्देशांक 168.2, भांडवली वस्तूंसाठी 134.8, मध्यवर्ती वस्तूंसाठी 173.1 आणि पायाभूत / बांधकाम साहित्याचा निर्देशांक 212.3 नोंदवला गेला. याशिवाय ग्राहकोपयोगी वस्तू आणि बिगर ग्राहकोपयोगी वस्तूंचे निर्देशांक अनुक्रमे 138.5 आणि 147.9 नोंदवले गेले.
- मार्च 2024 च्या तुलनेत मार्च 2025 मध्ये वापर-आधारित वर्गीकरणानुसार आयआयपीचा संबंधित वाढीचा दर प्राथमिक वस्तूंमध्ये 3.1 टक्के, भांडवली वस्तूंमध्ये 2.4 टक्के, मध्यवर्ती वस्तूंमध्ये 2.3 टक्के, पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तूंमध्ये 8.8 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये 6.6 टक्के आणि कमी कालावधीसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये (-) 4.7 टक्के आहे (स्टेटमेंट III). वापर-आधारित वर्गीकरणाच्या आधारे, मार्च 2025 महिन्यातील आयआयपीच्या वाढीमध्ये आघाडीचे तीन सकारात्मक योगदानकर्ते आहेत – पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तू, प्राथमिक वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू.
- गेल्या 13 महिन्यांतील आय आय पी चा मासिक निर्देशांक आणि विकास दर (% मध्ये)

मार्च 2025 महिन्याच्या आयआयपीच्या त्वरित अंदाजांसह, डिसेंबर 2024, जानेवारी 2025 आणि फेब्रुवारी 2025 च्या निर्देशांकांमध्ये स्त्रोत एजन्सींकडून प्राप्त झालेला अद्यतनित डेटा पडताळल्यानंतर अंतिम सुधारणा करण्यात आली आहे.