गोवा खबर : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) तात्पुरत्या वेतन आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की फेब्रुवारी 2025 मध्ये या योजनेत 15.43 लाख नवीन कर्मचारी जोडले गेले आहेत.
फेब्रुवारी 2025 मध्ये 23,526 नवीन आस्थापनांना कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणण्यात आले आहे, त्यामुळे अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा सुनिश्चित झाली आहे.
| शिर्षक
|
फेब्रुवारी 2024 |
फेब्रुवारी 2025 |
वाढ |
| या महिन्यात योगदान देणाऱ्या सर्व विद्यमान कर्मचाऱ्यांची संख्या
|
2,91,38,395
|
2,97,04,614
|
5,66,219
|
ही आकडेवारी पाहता, हे लक्षात येते की फेब्रुवारी महिन्यात समावेश झालेल्या एकूण 15.43 लाख कर्मचाऱ्यांपैकी 7.36 लाख कर्मचारी म्हणजे एकूण नोंदणीपैकी सुमारे 47.7% कर्मचारी हे 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत.
तसेच, वेतन आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की फेब्रुवारी 2025 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 3.35 लाख होती. याशिवाय, फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 74 तृतीयपंथी कर्मचाऱ्यांनी देखील कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे, जी समाजातील प्रत्येक घटकाला या योजनेचे फायदे पोहोचवण्यासाठी ईएसआयसीच्या वचनबद्धतेची साक्ष देते.
आकडेवारी निर्मिती ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने ही वेतन आकडेवारी तात्पुरती आहे.