Connect with us

गोवा खबर

२६ मांद्रे, २७ वाळपई, २९ एप्रिल शिरोडा : मराठी राजभाषेसाठी प्रखंड मेळावे सुरू

Published

on

Spread the love

गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीच्या प्रखंडशः मराठीप्रेमींच्या मेळाव्यांची सुरुवात, तसेच गेली ४० वर्षे मराठीवर झालेल्या अन्यायाबाबतच्या “जनजागरण अभियाना” चा शुभारंभ मांद्रे येथील मेळाव्यापासून उद्या, शनिवार, दि. २६ एप्रिल, २०२५ पासून करण्यात येत आहे.

मांद्रे येथील श्रीभगवतीच्या मंदिरात देवीला माल्यार्पण करून व मराठी राजभाषा आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सांगणे करून मराठी राजभाषा निर्धार समितीच्या आंदोलनाच्या या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे.

जिल्हापंचायत सभागृह, देऊळवाडा, मांद्रे येथे सायं. ५.३० वाजता होणाऱ्या सदर प्रखंडमेळाव्यात प्रखंडाची समिती निवडण्यात येणार असून आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम स्थानिक पातळीवरून करण्यात येतील. परवा, रविवार, दि. २७ एप्रिल रोजी सायं ४.३० वाजता सत्तरी प्रखंडाचा मेळावा, गोविंद काणेकर सभागृह,वाळपई येथे संपन्न होईल.

मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी शिरोडा प्रखंडाचा मेळावा, श्री रवळनाथ सभागृह, शिरोडा येथे सायं. ५.०० वाजता घेण्यात येणार आहे. मे आणि जून महिन्यात उरलेल्या प्रखंडांचे मेळावे घेण्यात येतील.