Connect with us

गोवा खबर

ग्रामपंचायत वार्ड पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा राज्य निवडणूक आयोगाने  हार्देश तालुक्यातील थिवी या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १, अस्नोडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ आणि मुरगांव तालुक्यातील चिखली या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 

वरील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी ११ मे रोजी मतदान होईल.  मतमोजणी १२ मे २०२५ रोजी होईल.

पोटनिवडणूकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, निर्वाचन अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी आणि निरीक्षकांची नियुक्त केली आहे.  संबंधित प्रभागासाठी वॉर्डनिहाय मतदार यादी ८ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मतदानाची पद्धत मतपत्रिकेद्वारे आहे. सकाळी ८.०० ते संध्या ५.०० पर्यंत मतदानाची वेळ असेल. उमेदवारासाठी प्रत्येक ग्रामपंचायत वॉर्डसाठी खर्च मर्यादा ४०,०००/- रुपये आहे. आचारसंहिता १६ एप्रिलपासून लागू झाली आहे.

उमेदवारी अर्ज २१ ते २८ एप्रिलपासून रविवार सोडून स्वीकारण्यात येईल. अर्जांची छाननी २९ एप्रिल रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल अशी आहे.