Connect with us

गोवा खबर

भारतीय महसूल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मू यांची भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय महसूल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांनी (78 वी तुकडी) आज (4 मार्च) राष्ट्रपती भवन इथे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

यावेळी राष्ट्रपतींनी या प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांना संबोधित केले. भारतीय महसुली सेवेचे अधिकारी हा शासन आणि कल्याणकारी योजनांच्या अनुषंगाने शासन प्रशासन व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा घटक असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.  देशाच्या गतीमान अर्थव्यवस्थेसाठी करांचे महत्त्वही राष्टपतींनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. भारतीय महसुली सेवेचे अधिकारी या नात्याने कर या महत्त्वाच्या संसाधनाचे संकलन न्याय्यपूर्ण, प्रभावीरित्या आणि पारदर्शक पद्धतीने सुनिश्चित करण्यात या अधिकाऱ्यांना अत्यंत महत्त्वची भूमिका पार पाडावी लागणारअसल्याची जाणिवही राष्ट्रपतींनी त्यांना करून दिली.

भारतीय महसूल सेवेच्या (78 वी तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये रॉयल भूतान सेवेचे दोन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचाही समावेश होता. हे दोन्ही अधिकारी नागपूर इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकदामीमध्ये (NADT) प्रारंभिक प्रशिक्षण घेत आहेत.